वानवडी क्षेत्रीय कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी कोंढव्यातील नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल,

(corporator sainath babar news)

(corporator sainath babar news) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

रामटेकडी- वानवडी क्षेत्रीय कार्यालयात बेकायदेशीरपणे जमाव जमवून शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर कचरा टाकल्या प्रकरणी

कोंढवा येथील नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police case-filed-against-kondhwa-corporator-sainath-babar

हकीकत अशी की वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त हे दिल्ली येथील पथकासोबत

Advertisement

त्यांचे मनपा कार्यालयाचे कार्यक्षेत्रांत येणारे प्रभागांतील स्वच्छ सर्वेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी कार्यालयांच्या बाहेर आले होते,

नगरसेवकांनी त्याच्यासोबत इतर १० ते १५ कार्यकर्ते गोळा करून गैर-कायदयाची मंडळी जमवून,

मनपा पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध न पाळाता वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयातील उप-अभियंता

व अधिक्षक यांना जबरदस्ती करुन सहाय्यक आयुक्त यांच्या केबीन मध्ये घुसुन त्यांच्या कार्यालयांत ओला,

Advertisement

वाचा : विज मिटर कट करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांसमोर धिंगाणा घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

फिर्यादी व कार्यालयांतील इतर सहकारी यांना सरकारी कामकाज करतांना त्यांना त्यांचे सरकारी काम करु न देता

त्यांच्या टेबलवर व कार्यालयांतील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यात अडथळा निर्माण केला आहे.

Advertisement

तसेच सध्याचे कोविड-१९ चे काळांत शासनाने तोंडास मास्क लावावा व सोशल डिस्टगसिंग ठेवावे असे आदेश निर्गमित केलेले असतांना देखील

त्याबाबतचे कोणतेही नियम न पाळता ते स्वतः राजकीय पक्षाचे नगरसेवक असतांना त्यांनी व त्यांच्या व कार्यकर्ते यांनी

देखील नियम पाळलेले नसल्याचे महिला सहाय्यक आयुक्त यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उमेश कदम करीत आहेत.

Advertisement

वाचा : कॅम्प परिसरात एकावर जीव घेणा हल्ला,

%d bloggers like this: