बनावट ई-पास तयार करुन महाराष्ट्र शासनाची व नागरिकांची फसवणुक करणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerGOLDEN NIGHTebook.trendingstudy
Advertisement

महाराष्ट्र पोलीसांचा लोगोचा वापरुन ई-पासची केली विक्री.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सध्या पुणे शहर पोलीसांनी जिल्हया बाहेर जाण्यासाठी ई पास सक्तीचे केले आहे.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

तर काही नागरिकांना ऑनलाईन ते अर्ज भरता येत नसल्याने काहींची मदत घ्यावी लागते परंतु त्या मदतीच्या आड मध्ये बनावट ई-पासेस तयार करुन देवून फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सध्या चालु असलेल्या कोविड-१९ महामारीच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा सारख्या वस्तुंचा काळाबाजार करणारे तसेच लोकांना बनावट दाखले,किंवा रिपोर्ट देणारे लॉकाची माहिती काढुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.

कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले असुन अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाचे कामकाजाकरीता परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणेकरीता महाराष्ट्र शासनाने Covid 19 Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई-पास संदर्भात ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणे बंधनकारक केले आहे.

Advertisement

सामाजिक सुरक्षा विभाग पुणे शहर कडील पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके हे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धनाजी गंगनमले रा. भेकराई नगर, फुरसुंगी हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत

स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता आपले स्वतःचे मोबाईलव लॅपटॉप वरुन Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवर नागरिकांचे फॉर्म भरुन ई-पास हा बनावट बनवुन विक्री केल्याची

बातमी प्राप्त होताच बातमीचे ठिकाणी स्टाफसह जावुन खात्री केली असता धनाजी मुरलीधर गंगनमले, वय-२९ वर्षे, रा. फ्लॅट नं. डी-२०३, दुसरा मजला, विश्वसृष्टी सोसायटी,भेकराई नगर पापडे

वस्ती, फुरसुंगी हा त्याचे राहते घरामध्ये त्याचे स्वतःचे मोबाईल व लॅपटॉपवर Covid19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई-पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करुन महाराष्ट्र

Advertisement

शासनाची व ई-पास धारकांची फसवणुक करुन बनावट ई-पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवून त्यावर महाराष्ट्र पोलीसांचा लोगो वापरुन ई-पासची विक्री केली आहे. त्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
%d bloggers like this: