गावठी रिव्हॉल्व्हर व कोयता घेवुन वस्तीत दहशत करणाऱ्या तडीपाराला पोलीसांनी केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Police arrested Tadipar)भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

(Police arrested Tadipar) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील हददीतील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार पण्पु ऊर्फ प्रविण अंनता येणपुरे,

वय २७ वर्षे, रा. सच्चाई माता नगर, अटल नंबर १० चाळ, रुम नंबर ४३, आंबेगाव खुर्द, पुणे याला दोन वर्षा करिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

१० फेब्रुवारी रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख व अभिजीत जाधव यांना बातमीदारामार्फत मिळाली

एक इसम शनीनगर परिसरात हातात कोयता घेवुन फिरुन वस्तीतील लोकांना, दुकानदारांना धमकावुन आरडा ओरड करत दहशत करत आहे.

अंमलदार अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले असता

सदर आरोपी हा भारती विद्यापीठ पोलीस रेकॉर्डवरील सराईत व तडीपार असलेला गुन्हेगार आहे.

त्याच्या जवळील कोयता काढुन घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस अशी हत्यारे मिळुन आल्याने त्याचेवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

सदरील कामगिरी सर्जेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, संगिता यादव, पोलीस निरीक्षक ( गुन्हे),

पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर,

सोमनाथ सुतार, गणेश सुतार, सर्फराज देशमुख, समिर बागसिराज, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, व विक्रम सावंत यांनी केली.

Advertisement
Share Now