दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बागळणाऱ्या तडीपार गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या,

पिस्टल व जिवंत काडतुसेसह मुद्देमाल जप्त.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बागळणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या दत्तवाडी पोलीसांनी,

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हयांना प्रतिबंध करण्याकामी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत पोलिस,

उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व अमंलदार अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले व कुंदन शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत,

बातमी मिळाली की, “एक इसम त्याच्या अंगात निळया रंगाची जिन्स पॅन्ट व काळया रंगाचा टी-शर्ट तो अंगाने सडपातळ असुन त्याचे डोक्याचे केस मोठे असुन मानेपर्यंत लांब आहे.

Advertisement

त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्टल असुन, ते घेवुन तो तावरे बेकरीजवळ अरण्येश्वर, पुणे येथे रस्त्याचे कडेला एकटाच कोणाची
वाट बघत थांबला आहे.

तत्काळ दोन पंचासह तावरे बेकरीजवळ अरण्येश्वर, येथे गेले व पाहणी केली असता तेथे मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा इसम,

पाठमोरा थांबलेला दिसला खात्री झाल्याने त्यास पोलीस उपनिरिक्षक लोहार व कर्मचाऱ्यांनी पकडले असता तो दत्तवाडी,

पोलीस ठाणेकडील तडीपार गुन्हेगार रोहीत विजय अवचरे रा.शाहु वसाहत, गजानन महाराज मठासमोर, लक्ष्मीनगर पर्वती, पुणे हा,

Advertisement

असल्याचे दिसुन आले. त्यावेळी पोलीसांनी त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेले एक देशी,

बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ३० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. अवचरेला पुणे शहरातुन एक,

वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे असुन लक्ष्मीनगर पर्वती भागामध्ये दहशत करणेसाठी पिस्टल जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपीवर दत्तवाडी पोलीस ठाणे येथे यापुर्वी दंगा, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे,

Advertisement

दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलिस निरीक्षक ( गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास,

पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले,महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले,

सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर,प्रमोद भोसले, शरद राऊत, यांनी केली आहे.

Advertisement
%d bloggers like this: