भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे-बॉयला पोलिसांनी केले जेरबंद,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पुण्यातील रविवार पेठेतील घटना.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलीस अंमलदार अजय थोरात यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहीती मिळाली की समीर ढमाले रा. रविवार पेठ पुणे याने दिनांक २३ जानेवारी रोजीचे मध्यरात्री त्याचा वाढदिवस साजरा करताना भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापला आहे.

तो आता तलवार घेवुन रविवार पेठ पुणे परिसरात फिरत आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी काल रविवार पेठ पुणे या भागात सापळा लावुन संशयीत समीर अनंत ढमाले वय – २७ रा.५७८ गणेश पेठ लोणकर वाडा पुणे यास तलवारीसह ताब्यात घेतले आहे.

त्याचे ताब्यातुन २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ लांबा नक्षीदार मुठ असलेली पौराणिक तलवार हस्तगत करण्यात आलेली आहे.

त्यास पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

त्याचेविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी गुन्हे शाखा युनिक १ चे वरिष्ठ पालीस निरीक्षक सुनिल ताकवले,पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , महेश बामगुडे यांनी केली आहे.

Advertisement
Share Now