घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलले ताब्यात,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
tadipar-criminal-arrested-by-crime-branch
संग्रहित फोटो

२९ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : दिपावली सणाचा फायदा घेत घरफोडी करणाऱ्या चोरांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेउन बेड्या ठोकल्या आहेत.

घरफोडी चोरीचे गुन्हे असलेले रेकॉर्डवरील २ आरोपी व १ अल्पवयीन मुलाकडून सोन्याचे दागिने व चांदिचे विटा जप्त करुन एकुण ७ घरफोडी चोरीचे व ५ चारचाकी चोरीचे असे,

एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन २९ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने हडपसर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हडपसर पोलीस,

तपास पथकातील अधिकारी गुन्हे प्रतिबंध पेट्रोलींग फिरत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस रेकॉर्डवरील आरोपी हे म्हाडा कॉलनी हडपसर येथे थांबलेले आहेत.

सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन सनीसिंग पापासिंग दुधानी वय १९ वर्षे रा. बिराजदानगर गल्ली नं. ५, हडपसर पुणे , व सोहेल जावेद शेख वय १९ वर्षे रा. गोसावी वस्ती कॅनॉल शेजारी,

हडपसर पुणे यांना पकडून त्यांचेकडे गुन्हयाचा तपास केला असता त्यांनी गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली.

त्यांच्याकडे तपास केला असता त्यांचेकडून २५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३.५० किलो चांदिचे विटा, दोन ईको फोर व्हिलर, दोन सेन्ट्रो फोर व्हिलर, एक बोलेरो फोर व्हिलर असे,

एकुण ७ घरफोडीचे व ५ चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. हडपसर पोलीसांकडील ५ गुन्हे, लोणी काळभोर पोलीसांकडील २ गुन्हे असे घरफोडी चोरीचे तसेच,

चारचाकी वाहन चोरीचे दत्तवाडी पोलीस ठाण्यातील १ गुन्हा, बिबवेवाडी पोलीस १ गुन्हा, लोणी काळभोर पोलीस ठाणे १ गुन्हा, लोणीकंद पोलीस १ गुन्हा,

शिवाजीनगर पोलीस लातूर १ गुन्हा असे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी हे हडपसर पोलीस ठाण्यातीकडील रेकॉर्डवरील अट्टल चोरटे व गुन्हेगार असुन त्यांचेकडे हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Share Now