सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून १५ लाखाची खंडणीची मागणी करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ खंडणी घेताना केली अटक.( Dagdusheth Ganpati Temple Pune)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सोशल मिडियावर ( social media) फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या संदर्भात एका महिलेने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती.फिर्यादी व त्यांचे मैत्रिणीचे फोटो व व्हिडीओ घरच्यांना पाठवुन तसेच सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करु अशी भिती घालुन अनोळखी इसमांनी १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन २ लाख ६० हजार रुपये फिर्यादी याचेकडुन वेळोवेळी घेवून फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण केली आहे.

अशी तक्रारी अर्ज खंडणी विरोधी पथकाकडे प्राप्त झाला होता. प्राप्त तक्रारी अर्जाची खातरजमा केली असता आरोपींनी फिर्यादी व तिचे मैत्रीणीचे फोटो व व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची भिती घालून १५ लाख रुपये खंडणी मागुन सदर रक्कमेपैकी २ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम फिर्यादीस वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करुन, धमकी देवून वसूल केली होती असे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानंतर फिर्यादी यांनी दिनांक ३ सप्टेंबर पर्यंत उर्वरीत रक्कमेपैकी १ लाख रुपये हे दगडु शेठ गणपती मंदिराजवळ, पुणे येथे आणुण दिले नाही तर मैत्रिणी सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी फिर्यादीस दिली होती.

खंडणी विरोधी पथकातील अधिका-यांनी सापळा रचुन दगडुशेठ गणपती मंदिराजवळ येथे मिथुन मोहन गायकवाड वय २९ वर्षे रा. कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर यांस फिर्यादीकडुन १ लाखांची खंडणी
घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

मिथुन गायकवाड याने सदरचा गुन्हा हा महिला प्रियंका क्षिरसागर, वय २१ वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वे नगर व अन्य एक इसम यांचेसह मिळुन केल्याचे कबुल केल्याने फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ( Vishrambag Police Station Pune)

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहा पोलिस आयुक्त डाँ रविंद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे याच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
बालाजी पांढरे,संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे,

मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपुत, अतुल साठे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आव्हाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी
केली आहे.

Advertisement
Share Now