गाडीची काच फोडून म्युझिक सिस्टम चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : गाडीची काच फोडून महागातले म्युझिक सिस्टम चोरी करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. १६ सप्टेंबर रोजी येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे फोर व्हिलर गाडीची काच फोडून गाडीतील म्युझिक सिस्टम कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले म्हणून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र
आळेकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डॉन बॉस्को शाळेचे मागील सार्वजनिक रोडलगत पांढरे रंगाचे एक्सेस गाडीसह एक इसम म्युझिक सिस्टीम विक्री करता थांबलेला आहे.

असे समजल्याने येरवडा तपास पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी त्यास पळून जात असताना पकडले. इरफान खालीद सय्यद, वय २८ वर्ष, धंदा-प्लंबर, रा. स. नं. १२, पोलीस चौकीजवळ, लक्ष्मीनगर येरवडा असे नाव असल्याचे सांगितले.

इरफान सय्यद याच्या ताब्यातील अॅक्सेस मोपेड गाडीची झडती घेतली असता सदर गाडीचे डिक्कीत एक काळे रंगाची डीएचसी कंपनीचा अँड्रॉइड कार म्युझिक सिस्टीम व एक लोखंडी काळे रंगाची अॅडजेस्टेबल पक्कड असे मिळुन आले आहे.

त्याबाबत इरफान याला विचारले असता त्याने सदरची म्युझिक सिस्टीम हि १६ सप्टेंबर रोजी अनुसया शाळेसमोर पार्क केलेली कारची काच दगडाने फोडुन चोरल्याचे कबुल केले आहे.

इरफान याला अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने आणखीन ४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.‌

२ वुप्पर, १ ऍल्पीफायर, १ अॅन्ड्राईड कार म्युझिक सिस्टम, २ स्क्रिन टेप, १ रुफ स्क्रीन, १ टू व्हिलर असा एकूण १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४,पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी रविंद्र आळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके,

प्रदिप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे,शेख, गणेश वाघ, किरण घुटे, सचिन माळी, गणेश शिंदे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, अजित वाघुले, स्वप्नील मराठे यांनी केलेली आहे.

Advertisement
Share Now