टँकर मधुन ऑईल चोरी करुन त्यामध्ये काळया रंगाची भेसळ करणारी टोळी गजाआड,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : ऑईल चोरी करून त्यात काळे रंग टाकून भेसळ करणाऱ्या टोळीला पोलीसांनी गजाआड केले आहे.
सागर पाटील पोलीस उप-‌आयुक्त परिमंडळ-०२, यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली,कात्रज जुना घाट मध्ये भिलारेवाडी,आर.के.ट्रान्सपोर्ट शेजारील मोकळया जागे मधील झाडा-झुडपांच्या पाठीमागे ऑईलचे दोन टँकर उभे असुन,त्यामधुन काही लोक ऑईल चोरीकरीत आहेत.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने उप- आयुक्तांनी सहकारनगर पोलीस ठाणे व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्या मधील अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्तीक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीची शहनिशा करण्या करीता पाठवुन दिले. संयुक्त पथक हे मिळालेल्या बातमीची शहनिशा करण्याकरीता नमुद ठिकाणी गेले असता,सदर ठिकाणी चार इसम टँकर मधुन ऑईल चोरी करीत असताना दिसुन आले.

त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते सदर ठिकाणाहुन पळुन जात असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. १) राजु मानसिंग जाधव,वय ३५ वर्षे,रा.जैन मंदिर संतोषनगर काञज,पुणे. २)श्रीकांत श्रीमंत पाटोळे,वय ३७ वर्षे, रा.खंडाळे चौक, तळजाईवसाहत, सहकारनगर, ३)हुसेन रज्जाक शहाआलम,वय-३७ वर्षे, रा.शिवाजीनगर गोवंडी,मुंबई. ४)सुशिल कुमार रॉय,वय ४२ वर्षे ,रा.९०,फिट रोड,साकीनाका मुंबई असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.


अधिक माहीती घेता सदरची चोरी ही अमित जगदिश पांडे,रा.लेननं ०७, संतोषनगर,कात्रज.यांचे सांगणेवरुन केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले.पोलीस अंमलदार सागर रघुनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ व इतर प्रमाणे गुन्हा दाखल करुन,त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दिनांक १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.

सदर कारवाई मध्ये एकुण ४ टॅकर,२ अॅक्टीवा मोटर सायकल व इतर साहित्य असा एकुण रुपये ४२ लाख ३ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई सागर पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ०२, सहाय्यक आयुक्त जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक अंकुश कर्चे,

पोलीस अंमलदार,शिंदे, जाधव, गाडे सर्व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, तसेच पोलीस उप निरीक्षक,घाडगे, पोलीस अंमलदार, इंगळे, फरांदे, नाळे, सुतकर, मंडलिक ,सहकारनगर पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Advertisement
Share Now