गुंड शरद मोहोळला दोन महिने पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात प्रवेशास बंदी,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

खडक पोलीसांनी केला होते विविध प्रकारचे गुन्हे दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे जोरात सुरू आहे.

२६ जानेवारी कृष्णहट्टी चौक राजकुमार बॅन्ड समोर, गुरुवार पेठ, पुणे या ठिकाणी पतित पावन संघटनेचे शाखेचे वतीने सुर्वण महोत्सव वर्ष ५० वा वर्धापनदिनाचे निमीत्त आयोजित सत्यनारायण महापुजेकरीता पुणे शहरातील गँगस्टर मोहोळ टोळीचा म्होरक्या

शरद हिरामण मोहोळ व त्याचे साथीदार २) अक्षय भालेराव ३) आलोक भालेराव ४) सिताराम खाडे ५)दिनेश भिलारे ६)विश्वास मनेरे ७) मनोज पवार ८) स्वप्नील नाईक ९)योगेश वाडेकर १०)मंगेश धुमाळ तसेच त्यांचे १० ते १२ साथीदारासंह बेकायदशीर गर्दी जमाव तयार करुन, आरडाओरडा करीत कार्यक्रमाचे ठिकाणी आले.

शरद मोहोळ व त्याचे सोबत असलेल्या साथीदार त्याठिकाणी आल्यानेतेथे हजर जमलेल्या लोकांपैकी काही लोक त्यांचे भितीने घाबरुन तेथुन निघुन गेले.

सदर भागात शरद मोहोळ व त्याचे सोबत असलेल्या साथीदारांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले. गँगस्टार गुंड शरद मोहोळ हा नुकताच येरवडा कारागृहातुन गुन्हयामधुन निर्दोष सुटला असल्याने आपली व आपले गॅगची पुणे शहरात पुर्वीप्रमाणेच दहशत रहावी या उद्देशाने सदर ठिकाणी दहशत निर्माण केली.

सदर ठिकाणी त्यांनी कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी न घेतलेने आजाराचा प्रार्दुभाव होण्यास व आजाराचा प्रसार होण्याचे गैरकृत्य केले.

म्हणुन गुंड शरद मोहोळ व त्याचे साथीदारांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद हिरामण मोहोळ, वय ३८ वर्ष रा.स.नं.११२ माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे यास परिमंडळ १ पुणे शहर व पुणे पोलीस आयुक्तांचे कार्यक्षेत्रातील, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन महिने प्रवेश व वास्तव्य करण्यास सक्त मनाई करणेबाबतचा आदेश पारीत केले आहे.

Advertisement
Share Now