४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Nigerian youth arrested) ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी.

(Nigerian youth arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

अमली पदार्थ विक्री करण्यास मनाई असताना कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियन इसमाला चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बाणेर येथील सं नं ११०/१११ मित्रनगर कॉलनी शॉप नंबर २ राजयोग सोसायटी समोर,

अन्नापुर्णा हॉटेलचे समोरील सार्वजनिक रोडवर शोएब तौफिक ओलाबी, (SHUAIB TAOFIQ OWOLABI)

वय ४० वर्षे, रा.झु व्हिलेज वाशी, देवी ज्योती सोसायटी फ्लॅट नंबर ३०२, वाशी नवी मुंबई मुळ रा. नायजेरिया

हा बेकायदेशीररित्या त्याचे कब्जात विक्रीसाठी २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन कि रु ४ लाख ३२०० रूपये रोख व दोन मोबाईल फोन,

एक नायजेरिया देशाचा पासपोर्ट,

रिकाम्या प्लास्टिक पारदर्शक पिशव्या एकुण २२ व निळ्या रंगाचा टिक्सोटेप चे एकुण २२ तुकडे

असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ त्याचे ताब्यात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे.

वाचा : कोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,

त्याच्या विरोधात चर्तुःशृंगी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक सुजित सुनिल वाडेकर यांचे फिर्यादी दिली असून

त्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायजेरियन इसमाला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक डी एल चव्हाण अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा, सहा.पोलीस आयुक्त, सुरेंद्रकुमार देशमुख,

गुन्हे शाखा,यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, सुजित वाडेकर,

संदिप जाधव, राहुल जोशी,प्रविण उत्तेकर, नितीन जाधव, पांडुरंग पवार, संदेश काकडे यांनी केली आहे.

वाचा : पुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

Advertisement
Share Now