आम्ही येथील भाई आहोत,आम्हाला कोणी खुन्नस द्यायची नाही असे म्हणत एकावर जीव घेणा हल्ला.

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

मंगळवार पेठेतील घटना, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : हातातील कोयते फिरवत आम्ही येथील भाई आहोत, आम्हाला कोणी खुन्नस द्यायची नाही असे म्हणत एकावर जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार पुण्यातील मंगळवार पेठेत घडला आहे.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशी की रहीम कुरेशी वय- २३ वर्षे,रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ पुणे वेलविशर शॉप समोर सोमवार पेठ सदानंद नगर जवळील बाकड्या शेजारी हे त्यांचे मित्र रफिक शेख,

अल्ताफ इनामदार ,उमर शेख,बुरहान शेख यांच्यासोबत बाकड्यावर गप्पा मारत असताना चेतन संजय चव्हाण,वय-२१,रा.२१३,मंगळवार पेठ, संकेत अनंत तारू,वय-२१,रा. कसबा पेठ

व इतर साथीदारांनी दोन मोपेड गाड्यांवरुन ट्रिपल सीट हातात कोयते हवेत फिरवत फिर्यादी कुरेशी यांचेजवळ येवुन,मी इथला भाई असताना सुध्दा हा मला नेहमी खुन्नस देतो,

हा सुरज ठोंबरेला भेटत असतो असे म्हणुन कुरेशीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता डोक्यात मारण्यासाठी उगारला असता कुरेशीने उजव्या हाताने कोयता अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे उजव्या हाताच्या कोपराचे पुढे गंभीर दुखापत झाली.

तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पोटा जवळ कमरेवर वार केला.

त्यावेळी कुरेशीचा मित्र रफीक शेख व अल्ताफ इनामदार हे त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आले असता, त्यांनासुद्धा कोयत्याने, लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.

त्यानंतर सदर परिसरात जोर-जोरात ओरडुन व हवेत कोयते फिरवत आम्ही येथील भाई आहोत, आम्हाला कोणी खुन्नस द्यायची नाही असे म्हणुन सदर भागात दहशत निर्माण केली.

त्यांचे दहशतीस घाबरुन फिर्यादी व साक्षीदार हे जीव वाचविण्यासाठी पळुन जात असताना तेथील आजुबाजुचे लोक घाबरुन सैरावैरा पळु लागले.

त्यावेळी दुकानदारांनी आरोपीचे दहशतीला घाबरुन त्यांची दुकाने बंद केली.

त्यानंतर आरोपी यांनी जाताना गाडीवर बसुन हवेत कोयते फिरवत निघुन गेले .

पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करत आहे.

Advertisement
Share Now