पुणे शहरात गोळ्या झाडून युवकाचा खून,
Murder of a youth : गोळ्या झाडून युवकाचा खून, स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीची वातावरण.

Murder of a youth : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :पुणे शहरात दिवसेंदिवस दिवसाढवळ्या खूनाचे सत्र सुरूच असून पोलिस यंत्रणेला एका प्रकारे गुन्हेगारांनी आह्वानच दिले आहे.
पोलिसांची पकड सैल झाल्याची चर्चा सर्वत्र ठिकाणी पसरली आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडणे आवश्यक आहे.
दत्तवाडीत मध्यरात्री एका खुनाचा थरार उडाल्याने गोंधळ उडाला. तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सायबर क्राईम विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न
हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.अमित मिलिंद सरोदे (वय 21, रा. जनता वसाहत,गल्ली नं. 15) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित हा येथील शाहू वसाहतीसमोरील बालाजी
होलसेलच्या जवळ थांबला असता अचानक आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी ननावरे याने पिस्तूलमधून गोळी झाडली.
ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई
त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
अचानक झालेल्या या गोळीबाराने मोठा गोंधळ उडाला होता.पूर्ववैमनस्यातून खुन झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या खुनाच्या थराराने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.
Nawale Bridge जवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान
Pingback: (online e pass) ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई