पुणे पोलिस आयुक्त कार्यालया जवळच गोळ्या घालून खून,
Pune police commissioner office : दोन खूनाच्या घटना घडल्याने पुणे हादरले.
Pune police commissioner office : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात आज दोन खूनाच्या घटना घडल्याने पुणे हादरले आहे.
चंदननगर भागातील गुन्हेगाराचा आज खून होऊन चोवीस तास होण्या अगोदरच दुसरा हि खून ,
आज पुण्यातील महत्त्वाचे ओळखल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालया जवळच एका वृद्धाला गोळ्या घालण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
वाचा : पुण्यामधील चंदननगर भागातील गुन्हेगाराचा खून
ज्या ठिकाणी खून करण्यात आला आहे त्या ठिकाणाच्या काही अंतरावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, बंडगार्डन पोलीस ठाणे आहे.
मोठ्ठ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालया बाहेरच खून करण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजेश कनाबर वय-६३ असे या मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे पोलीस आयुक्त कार्यालयपासून काही अंतरावर एसबीआय बँकेची ट्रेझरी आहे.
त्या बँकेच्या बाहेरील फुटपाथवर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी कनाबर यांच्यावर गोळीबार केला.
यामध्ये कनाबर खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
कनाबर यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वाचा > पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान
या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.
मृत व्यक्तीचा बाणेर येथील जागेवरून एक वादा होता. त्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
सुनावणी झाल्यावर, ते फुटपाथवरून जात असताना, मागून पळत आलेल्या दोन हल्लेखोरांनी काही समजण्याच्या आत त्यांच्यावर गोळी झाडली.
यामुळे ते खाली कोसळले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
Pingback: (yogesh tillekar arrested)माजी आमदार योगेश टिळेकरांसहित ४१ जणांवर गुन्हे..