पुण्यातील कॅम्प परिसरात मित्रानेच केला मित्राचा खून,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

पुण्यातील कॅम्प परिसरात मित्रानेच केला मित्राचा खून,

कॅम्प परिसरात उडाली खळबळ.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : मित्रांचे भांडणं कसे कधी कोणत्या स्तरावर जाईल हे सांगणे कठीण आहे.

दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागात मित्राचा चाकूने वार करुन त्याचा खून केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे.

उबेद बाबू कुरेशी वय २८ भीमपूरा गल्ली नं २३ कॅम्प पुणे असे खून
झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नबील शब्बीर बेलीम याला ताब्यात घेतले आहे.

कॅम्पातील बाबजान चौकात दोघे बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले.

यावेळी नबील याने उबेद याच्यावर थेट चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडला.

सदरील माहिती लष्कर पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याला रुग्णालयात नेले.

पण उबेदचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी नबील याला ताब्यात घेतले. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.

Advertisement
Share Now

One thought on “पुण्यातील कॅम्प परिसरात मित्रानेच केला मित्राचा खून,

Comments are closed.