कोंढव्यात तरुणावर जीवघेणा हल्ला : केले गंभीर जख्मी,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मित्रांनाही धारदार शस्त्राने व बेस बॉल स्टीकने मारहाण.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढव्यातील भाईगिरी काही कमी होण्याची नावच घेत नाही.

पोलीस आयुक्तांनी गल्लीतल्या भाईंना आवरने अंत्यंत गरजेचे आहे. मोठ्ठे भाई शांत झाले असताना आता छोट्या भाईंना उत आला असून त्यांचे मुसक्या आवढणे महत्वाचे आहे.

भाई बोलला नाही म्हणून एका तरुणावर जीव घेण्याचा प्रकार काल कोंढव्यात घडला आहे. फरहान‌ पिरजादे वय -१९,रा. कोंढवा-खुर्द,पुणे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फरहान हा त्याच्या मित्रासह एकत्र येवुन फुटबॉल खेळणेसाठी जात असताना काही दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने फरहानवर पालघन, कोयत्याने सपासप वार करुन जबर जखमी केले.

फरहानवर उपचार करीत जखमांवर तब्बल १०५ टाके घालून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविले आहे.

कोंढवा पोलिसांनी क्लॉईड, हर्षे, भूषण व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Share Now