बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी. ए. कायदयान्वये कारवाई,

४ वर्षामध्ये त्याच्या विरूध्द १२ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्यात परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी. ए.

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. सनी शंकर जाधव वय २२, रा.चैत्रबन वसाहत,बिबवेवाडी पुणे.३७,

हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता, लोखंडी रॉड ,लोखंडी,

टॉमी, लाकडी दांडके या सारख्या जीवघेणी हत्यारे बाळगुन खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत,दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे,

Advertisement

गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ४ वर्षामध्ये. त्याच्या विरूध्द १२ गुन्हे दाखल आहेत. त्या विरूध्द प्रतिबंधक कारवाई,

करण्यात येेऊनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे दिसून आले. गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परीसरातील,

सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे,

नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द,

Advertisement

करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. आयुक्तांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे,

विरुध्द दिनांक २८ डिसेंबर रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले असून त्याला २९

डिसेंबर रोजी स्थानबध्द करुन येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे ठेवण्यात आले आहे.

Advertisement
%d bloggers like this: