बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारी टोळी ताब्यात,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Mobile theft gang arrested) ७ मोबाईल हँडसेट जप्त

(Mobile theft gang arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

बस मधील गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाईल चोरणारी टोळीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणारी तीन जणांची टोळी खराडी बायपास चंदननगर येथे

चोरी करण्याचे उद्देशाने थांबलेले असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट-४ कडील पोलीस हवालदार दीपक भुजबळ व पोलीस नाईक,

सुरेंद्र साबळे यांना मिळाली होती.

सदरील बाब पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे,

जयदीप पाटील, यांचे पथक तयार करुन तात्काळ मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना केले.

वाचा : परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने गंडा घालणा-या महिलेला अटक,

खराडी बायपास या ठिकाणी बसमधुन चोऱ्या करणारे राहुल बाबु गायकवाड वय- ३० वर्षे, रा. ई १ बिल्डिंग, खोली नं ९२, पिंगळे वस्ती, पासपोर्ट ऑफिस समोर,मुंढवा,

सनि बाबु गायकवाड वय- ३२ वर्षे, रा. ई १ बिल्डिंग, खोली नं ६२, पिंगळे वस्ती,पासपोर्ट ऑफिस समोर, मुंढवा,

गुंडप्पा हणुमंत कवलदार वय- ३१ वर्षे, रा. ई १ बिल्डिंग‌ खोली नं ५२, पिंगळे वस्ती यांना युनिट-४ कडील पथकाने शिताफिने ताब्यात घेतले.

त्यांचे ताब्यात वेगवेगळ्या कंपनीचे ७ मोबाईल हँडसेट ४१ हजार रुपये किंमतीचे मिळुन आले.

त्यांच्या ताब्यात मिळुन आलेले मोबाईल त्यांनी बसमधुन गर्दीचा फायदा घेवुन चोरी केल्याचे कबुल केले आहे.

चोरांच्या ताब्यात मिळुन आलेला विवो कंपनीच्या वाय ९५ हा मोबाईल विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हयामधील असल्याचे निष्पन्न झाल्याने

त्यांना अटक करुन विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

आरोपींनी अशा प्रकारे बसमधील गर्दीचा फायदा घेवुन बरेच गुन्हे केले असल्याची शक्यता असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे,

पोलीस निरीक्षक श्री जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे,

पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार दिपक भुजबळ, सुरेंद्र साबळे,

प्रविण भालचिम, राकेश खुनवे, अशोक शेलार,सागर वाघमारे यांनी केली आहे.

वाचा : मोक्का मधील फरार असलेल्या आरोपीला कोंढव्यातून अटक,

Advertisement
Share Now