खासदार अमोल कोल्हे यांचे नावाचा गैरवापर करुन एका प्रसिध्द बिल्डरला पैशाची मागणी,
खासदार अमोल कोल्हे व चंद्रकांत पाटील यांचे नावाचा गैरवापर करणारा एकच व्यक्ती.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : आमदार- खासदार यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सध्या शहरात घडत आहेत. पोलिसांनी अश्या लोकांचे मुसक्या आवळल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कोथरूड येथील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एकाला पैसे मागितल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती.
तर आता थेट खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने एका बिल्डरला पैसे मागितल्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे.
हकीकत अशी की लॉकडाऊन काळामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नावाचा गैरवापर करुन एका प्रसिध्द बिल्डरला पैशाची मागणी केले बाबत चौकशी होवून कारवाई व्हावी.
याबाबतचा तक्रारी अर्ज शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे कार्यालयातून प्राप्त झालेला होता.
सदर प्रकरणी गुन्हे शाखा २, पुणे यांनी तपास करुन तोतयागिरी करुन फसवणारा विशाल अरुण शेंडगे वय-३२ वर्ष रा. टिळेकरनगर लेन नं. ७, कात्रज कोंढवा रोड , इस्कॉन टेम्पल मागे पुणे,
यास निष्पन्न करुन त्याच्याविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी यापूर्वीही लॉकडाऊन मध्ये मी आमदार चंद्रकांत दादा बोलतोय, असे नावाचा वापर करुन फोन करुन फसवणूक केलेली आहे.
त्याबाबत त्याचेवर कोथरुड पोलीस ठाण्यात २ तर अलंकार पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल आहेत.
तसेच यापूर्वीही खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
वरील कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंग, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे,
यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड,
पोलीस अंमलदार विनोद साळुंके, प्रदिप शितोळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, शैलेश सुर्वे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर यांनी केलेली आहे.