पुणे शहरातून बदल्या झालेल्या ३ पोलीस निरिक्षकांना मॅटने दिला दिलासा,

पुणे शहरा बाहेर बदली झालेले प्रकरण.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुदतीपूर्वी झाल्याने त्या आदेशा विरोधात पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.
मॅट कोर्टाने पुण्यात नियुक्तीचे आदेश दिले आहेत. राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे,
शंकर खटके व लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या शहरा बाहेर बदल्या केल्या होत्या.
मनीषा झेंडे, शंकर खटके आणि चंद्रकांत भोसले यांच्याबाबत मॅट कोर्टाने निकाल दिला आहे.
मनीषा झेंडे यांची सीपीआर, शंकर खटके यांची पुणे ग्रामीण तर चंद्रकांत भोसले बाहेर शहरात ट्रेनिग सेंटर येथे बदली झाली होती.
अन्याय झालेल्या या अधिकाऱ्यांनी बदल्यांबाबत मॅट कोर्टात धाव घेत दाद मागितली होती.
मॅट कोर्टने आज याबाबत निकाल दिला असून त्यांची पुन्हा पुण्यात नियुक्ती केली आहे.