मैत्रीचा बहाणा करून ५ लाखांचा ऐवज लंपास,
भामट्यास सिंहगड पोलीसांनी ठोकल्या बेड्या.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आज काल लोक मैत्रीचा गैरफायदा घेऊन ठगत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
असाच मैत्रीचा बहाणा करुन ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यास सिंहगड रोड पोलीसांनी अटक अटक केली आहे.
या संदर्भात अक्षय धावडे यांनी फिर्याद दिली आहे. धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेशने नावाच्या मुलाशी ओळख झाली होत.
त्याने हळुहळु ओळख वाढुन मैत्री केली. जवळची मैत्री झाल्याने ऋषिकेशने जॉब व राहण्याचा प्रॉब्लेम असल्याचे अक्षय यास सांगितले. आपला मित्र अडचणीत आहे.
हे पाहून त्याने ऋषिकेशला मित्राची रुम राहण्यास दिली. तसेच वेळोवेळी झालेल्या भेटीमुळे विश्वासाची मैत्री निर्माण झाल्याने त्यास स्मार्ट फोन व होंडा दुचाकी वापरण्यास देवुन मदत केली.
एकेदिवशी दोघेही नाष्ठा करत असताना ऋषिकेशने त्याची गर्लफ्रेन्डवर इम्प्रेशन मारण्यासाठी अक्षय याची १५ तोळयाची सोन्याची चैन मागुन घेवुन गळयात घातली.
नाष्टा करुन झालेवर ऋषिकेशने माझा मित्र येणार आहे जरा तिकडे बग असे फिर्यादी अक्षय यास म्हणुन त्याचे लक्ष विचलित करुन मोबाईल फोन, होंडा दुचाकी व १५ तोळयाची सोन्याची चैन असा,
५ लाखांचा मुद्देमाल घेवुन पसार झाला.गुन्ह्याचा तपास सुरु असताना ऋषिकेश हा आपली राहण्याची ठिकाणे सारखे बदलत होता. त्याचा शोध घेताना तांत्रिक तपासाच्या मददतीने मिळालेल्या,
माहीतीवरुन आरोपी ऋषिकेश मोहन बोंबले, वय २८ वर्षे, रा. खेड, मंचर, जि. पुणे यास ताब्यात घेवून अटक करुन दोन दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली.
तपासांमध्ये आरोपी ऋषिकेशकडुन होंडा दुचाकी व समार्ट फोन जप्त केले आहे. तसेच १५ तोळ्याची चैन ही एका नामांकित
फायनान्स कंपनीत गहाण ठेवुन ४लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
चैन फायनान्स कंपनीकडुन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सराईत आरोपीविरुध्द यापुर्वीही चंदनगर व चिखली पोलीस ठाणेमध्ये फसवणुकिचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी ऋषिकेश मोहन बोंबले याने कोणाची फसवणुक केली असल्यास पोलीसांत तक्रार दाखल करावी व नागरीकांनी अनोळखी इसमांशी मैत्री व मदत करताना योग्यती खबरदारी घ्यावी.असे अहवान पोलिसांनी केले आहे.