माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलीसांचा छापा,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Kondhwa police raid) Covid 19 चे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल.

(Kondhwa police raid) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे ;

माजी गृहराज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचे मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलीसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

कोंढव्यातील एनआयबीएम रोड वर बाकेर रमेश बागवे यांचे हॉटेल आहे.

त्या हॉटेलमध्ये कोव्हीड १९ नियमांचे उल्लंघन करत त्यांनी हे हॉटेल सुरू ठेवत त्याठिकाणी ग्राहकांना बसून जेवण दिले असल्याचे समोर आल्यानंतर

कोंढवा पोलीसांनी ( KONDWA POLICE) ही कारवाई केली आहे.

वाचा : पुणे महानगरपालिकेच्या महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शनची कारवाई,

kondhwa-police-raid-former-home-minister-ramesh-bagwes-sons-hotel
file photo

याप्रकरणी बाकेर रमेश बागवे,मॅनेजर प्रसाद प्रदीप शिंदे,

कामगार शाहरुख शेख यांच्यासह २२ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयबीएम रोडवर एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ‘द व्हिलेज’ हॉटेल आहे.

हे हॉटेल बाकेर बागवे यांचे आहे.

दरम्यान पोलिसांना या हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून जेवण दिले जात असल्याची माहिती मिळाली होती.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास याठिकाणी धाव घेत छापा टाकला.

यावेळी येथे पोलिसांना मालक बाकेरसह २२ जण मिळून आले.

यात काहीजण जेवण करताना दिसून आल्याने पोलिसांनी आदेशाचा भंग करत

हॉटेल सुरू ठेवून संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला.

यानंतर रात्री उशिरा या सर्वांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

वाचा : आंबिल ओढय़ात ठेकेदाराच्या चुकीमुळे घरांना गेले तडे;

Advertisement
Share Now

One thought on “माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलीसांचा छापा,

Comments are closed.