रेमडीसीवर इंजेक्शन काळाबाजारात विकणाऱ्या तरुणाला कोंढवा पोलीसांनी केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

स्वतःचे फायदयाकरीता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्री करुन फसवणुक.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुन्हा कोरोना संसर्गाने डोकें वर काढले आहेत तर पुणे सारख्या शहरात रेमडिसिवर इंजेक्शन मिळत नसल्याने खळबळ उडाली आहे.

तर काहीजण आपल्या फायद्यासाठी रेमडिसिवर इंजेक्शन काळाबाजारात विकत असल्याचे दिसून येत आहे.

मध्यंतरी पुणे पोलीसांनी रेमडिसिवर इंजेक्शन माल धरून काळाबाजार करणाऱ्यांचे मुसक्या आवळल्या आहेत.

असाच एक प्रकार पुन्हा कोंढवा पोलीसांनी उघडकीस आणला आहे.

कोंढवा येथील जायका हॉटेल जवळ अंकित विनोद सोळंकी, वय-२६, रा फ्लॅट नं.३०१,सुखवानीकॉम्प्लेक्स, दापोडी,


याने त्याचे ताब्यात विनापरवाना कोविड-१९ या रोगाचे संक्रमित
रुग्णांना लागणारे व प्रशासनाने खाजगी विक्री बंदी केलेले दोन रेमडीसीवर इंजेक्शन छापील किंमतीपेक्षा जास्त भावाने काळाबाजार करुन,

स्वतःचे फायदयाकरीता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्री करुन फसवणुक करुन,विक्री करत असताना मिळुन आल्याने कोंढवा पोलीसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Advertisement
Share Now