दुश्मनाला संपविण्याची दिली सुपारी कोंढवा पोलीसांनी तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केल्याने होणारा अनर्थ टळला”

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Kondhwa police arrest criminal) बबलु गवळीची घेतली होती सुपारी. कॅन्टोन्मेंटमधील नगरसेवकाचे नाव आले पुढे.

(Kondhwa police arrest criminal) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

कोण कधी दुशमनी काढेल या बाबतीत सांगता येत नाही. आज छोट्या छोट्या भांडणाचा राग मनात धरून थेट “गेम” करण्यापर्यंत मजल गेली आहे.

असाच एक प्रकार कोंढवा पोलीसांनी ( kondwa Police station) उधळून लावला आहे.

१४ जुलै रोजी कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार सुशिल धिवार यांना माहिती मिळाली की सध्या येरवडा जेल मधुन कोवीड-१९ रजेवर असणारा आरोपी

राजन जॉन राजमनी रा.भाग्योदयनगर कोंढवा व त्याचा मित्र इब्राहिम शेख यांनी कोणाचा तरी खुन करण्याची सुपारी घेतली असुन खुन करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पिस्टल जवळ बाळगलेले आहेत.

कोंढवा तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे, अंमलदार पो.हवालदार योगेश कुंभार पोलीस नाईक सुशिल धिवार,

पृथ्वीराज पांडुळे,गणेश चिंचकर,महेश राठोड, मोहन मिसाळ, निजाम मोगल, अभिजीत रत्नपारखी शोध घेतला असताना राजन राजमनी

हा लुल्लानगर ब्रिजखाली त्याचा साथीदार इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख, वय २७ वर्षे, रा.काळा खडक, सरकारी शौचालयाच्या जवळ,

बदरुद्दीन शेख यांच्या रुममध्ये भाडयाने, वाकड, पिपरी चिंचवड, पुणे याच्यासह मिळुन आला.

त्यावेळी त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीन देशी बनावटीचे पिस्टल, सहा मॅगझीन, सात जिवंत राऊंन्ड व रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये मिळुन आला आहे.

त्याच्याकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले.

त्यावेळी त्यांना पोलीस ठाणेस आणुन मिळालेल्या अग्नीशस्त्राबाबत कौशल्याने तपास केला असता राजन राजमनी याने सांगितले की,

कॅम्प मधील विवेक यादव (Vivek Yadav) यांच्यावर बबलु गवळी उर्फ एन.जी. याने ४-५ वर्षीपुर्वी कॅम्प भागात फायरिंग केली होती.

त्याचा बदला विवेक यादव याला घ्यायचा होता. आरोपी राजन राजमनी याला बबलु गवळी याचा खुन केल्याच्या

बदल्यात विवेक यादव याने राजन याला भरपुर पैसे देणार, पोलीस स्टेशन, कोर्ट,

जेल सर्व बघणार तसेच शिक्षा भोगत असलेल्या गुन्हयांमध्ये जामीन मिळुवुन देणार, असे सांगितले होते.

वाचा : कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

आरोपी राजन हा खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असुन सध्या कोविड रजेवर बाहेर आला आहे.

त्याच्याकडे कोर्ट काम काजासाठी पैसे नसल्याने बबलु गवळी याला मारण्याची सुपारी घेतली आहे.

राजन राजमनी, विवेक यादव यांनी मिळुन बबलु गवळी याला मारण्याचा प्लॅन तयार केला.

सदर खुनाच्या प्लॅन मध्ये आरोपी राजन राजमनी याने त्याचा येरवडा जेल शिक्षेत असताना

झालेला मित्र इब्राहिम उर्फ हुसेन याला सोबत घेतले होते. सदर दोन्ही आरोपी हे सुपारी घेवुन खुनाचा तयारीमध्ये असताना त्यांना पकडले.

सदर इसमा विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्याप्रकारे खुनाचा डाव पोलीसांनी कारवाई करुन उधळुन लावला.

त्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीसांचे कौतुक केले आहे.

सदरील घटनेचा तपास अमिताभ गुप्ता,मा.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,अप्पर पोलीस आयुक्त पुर्वे विभाग नामदेव चव्हाण,

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५. नम्रता पाटील साो, सहा. पोलीस आयुक् राजेंद्र गलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली,

सरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ,शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक गुन्हे,

यांच्या निगराणीखाली पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.

वाचा : पुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षकावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

Advertisement
Share Now