खडक पोलीस ठाण्याणे सराईत गुन्हेगारावर १ वर्षासाठी दाखल केला एम.पी.डी.ए,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

घातक हत्यारे जवळ बाळगणे,जबरी चोरी करणे, धमकी देणे, महीलांना छेडणे असे गुन्हा दाखल आहेत. (Khadak police station news)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आल्यापासून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगारावर एम.पी. डी.ए. दाखल करून गुन्हेराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आगामी पुणे मनपा निवडणूक २०२२ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक पावले उचलली आहे.

खडक पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील सराईत व अटट्ल गुन्हेगार योगेश मारुती गायकवाड, वय २५ वर्षे, रा. महादेव मंदिराशेजारी काशेवाडी भवानी पेठ, याच्या विरुध्द खडक पोलीसात सन २०१६ पासून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे,जबरी चोरी करणे, धमकी देणे, महीलांना छेडणे, सामान्य नागरिकाना विनाकारण मारहाण करणे यासारखे ९ गुन्हे दाखल आहेत.(Yogesh Maruti Gaikwad )

त्याची वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी त्याला २०१९ मध्ये १ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले होते. तडीपार करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही सुधारणा झालेली नव्हती. तर तेथील व्यापा-यांना व बिल्डरना खंडणी मागणे,सर्वसामान्य, नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी स्थानबध्द करणे बाबत चा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.


त्या अनुषंगाने ९ ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. खडक पोलीसांनी त्याला स्थानबध्द केले आहे.चालू वर्षामध्ये खडक पोलीसांकडून कडून पहिल्यांदाच सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए कायदया अंतर्गत मोठी कारवाई केल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा पोलीसांवरील विश्वास वाढला आहे.

सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे आगामी पुणे मनपा निवडणूक, सण व उत्सव काळात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटट्ल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शना खाली श्रीहरी बहिरट, हर्षवर्धन गाड़े पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अमंलदार नितिन जाधव, विशाल जाधव, तेजस पांडे, किरण शितोळे यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला आहे.

Advertisement
Share Now