पिस्टल घेवुन फिरणाऱ्या गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केली अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

घोरपडे पेठ मोमीनपुऱ्यातील घटना.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

११ जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस अंमलदार सागर केकाण व फईम सैय्यद यांना गुप्त बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की खडक पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज इक्बाल पटवेकर ह्याच्या

कंबरेला एक पिस्टल असुन तो मोमीनपुरा येथील छोटी मशिद शेजारील उसमानी रेस्टॉरन्टं (हॉटेल) येथे बसलेला आहे.

या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती देण्यात आली. त्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार यांच्यासह उसमानी रेस्टॉरन्टं येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज पटवेकर पोलीसांना दिसुन आल्याने त्यास झडप घालुन पकडण्यात आले.

परवेज पटवेकर यास पुर्ण नाव /पत्ता विचारता त्याने त्याचे नाव परवेज इक्बाल पटवेकर (वय २३ वर्षे रा.२८०, गुरुवार पेठ, बोंबीलवाडा पुणे) असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेस मागील बाजुस ३० हजार रुपये किंमतीचे १ गावठी पिस्टल व २ हजार रुपयांचे २ जिवंत काडतुसे मिळुन आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास सुशिल बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे हे करीत आहेत.

अटक आरोपी याचे पुर्वीचे रेकॉर्ड पाहता त्याच्यावर खुन, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरील कारवाई डॉ.प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व गजानन टोम्पे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना,पोलीस अमंलदार अजिज बेग, फईम सय्यद,

अनिकेत बाबर, गणेश सातपुते, संदिप पाटील, सागर केकाण,अमेय रसाळ, माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement
Share Now