एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पातील कनिष्ठ लिपीक महिलेला लाच घेताना अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : प्रवास भत्ता बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिक महिलेला रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालय,

मुळशी (जिल्हा परिषद अंतर्गत) येथील कनिष्ठ लिपिक महिला सीमा विद्याधर विपट वय ४७ वर्षे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे.

त्या संदर्भात एका २६ वर्षे पुरूषाने तक्रार दिली आहे.यातील तक्रारदार हे त्या विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यांचे प्रवास भत्ता बील

मंजुर केल्याचा मोबदला (टक्केवारी प्रमाणे) म्हणून आरोपी लोकसेवक विपट यांनी तक्रारदार यांचेकडे ३ हजार ४५० रुपये लाचेची मागणी केली होती.

आणि ती कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

त्या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल क्षीरसागर पोलीस निरीक्षक हे करत आहेत.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : प्रवास भत्ता बिल मंजूर केल्याचा मोबदला त्या संदर्भात एका २६ वर्षे पुरूषाने तक्रार दिली आहे.यातील तक्रारदार हे त्या विभागात कर्मचारी म्हणून

Advertisement
Share Now