पुणे शहरातील महिला व विद्यार्थिनींना रात्री घरी जाण्यास उशिर झाल्यास तातडीने पोलीस येतील धावून,

पुणे पोलीसांनी १०९१ हेल्पलाइन नंबर केले खुले.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सदरील घटना कमी करण्यासाठी पुणे पोलीसांनी हेल्पलाइन क्रमांक सुरू,

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

केल्याने रात्री अपरात्री कामावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही. पुणे शहरातील सर्व खाजगी,

शासकीय नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिला, विद्यार्थीनींना काही कामा निमित्ताने रात्री घरी जाण्यास उशिर होतो.

अशा वेळी त्यांना प्रवास करण्याकरीता सार्वजनिक- खाजगी वाहन उपलब्ध होत नाहीत. यापुर्वी पुणे शहरामध्ये रात्री कामावरुन घरी जाण्यास उशिर झाल्यामुळे काही महिला, विद्यार्थिनी यांचेवर,

Advertisement

लिफ्ट देण्याच्या बहाण्यावरुन त्यांचेवर इव्ह टिझींग, विनयभंग, हल्ले असे महिला संबंधीत गुन्हे घडलेले आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलीसांमार्फत महिला, विद्यार्थिनी यांच्या मदतीकरीता १०९१ या क्रमांकाची हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे.


या क्रमांकावर मदतीची मागणी होताच त्यांना त्यांचे घरी अथवा सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याकरीता संबंधीत पोलीस ठाण्याचे बिट मार्शल हे मदत करतील, वेळ पडल्यास त्यांना पोलीसस्टेशनकडील,

शासकीय वाहन उपलब्ध करुन त्यांना त्यांचे घरी सोडविण्याबाबत तसेच संबंधीत महिला, विद्यार्थिनींना रात्रीचे वेळी कॅबने अथवा,

ऑटोने प्रवास करणार असल्यास कॅब अथवा ऑटोचे रजिस्टर नंबर नोंदवुन त्यांना इच्छित स्थळी पोहचविण्या बाबत योग्यती खबरदारी घेण्याविषयी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सुचना देण्यात आले आहेत.

Advertisement

तरी जास्तीत जास्त खाजगी, शासकीय नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिला, विद्यार्थीनी यांनी सदर हेल्पलाईनचा.१०९१ उपयोग करणे बाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांचेकडुन अवाहन करण्यात आले आहे.

%d bloggers like this: