पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन भोवले, शहराध्यक्षासहित शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Former mayor against Case filed) माजी महापौर प्रशांत जगताप, महेश हांडे व इतरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

(Former mayor against Case filed) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टी भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शेकडों कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पुण्यातील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना ट्रोल करण्यात आले होते,

तर काही जणांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली होती.

वाचा : कासेवाडीत 2 सराईत गुन्हेगारासह 1 तडीपार गुन्हेगार हत्यारासह पोलिसांच्या जाळ्यात

ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी

अखेर पुणे पोलिसांनी माजी महापौर तथा शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख,सरचिटणीस रोहन पायगुडे ,

माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके यांच्यासह १००-१५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस आमलदार गणेश वीर यांनी तक्रार दिली आहे.

वाचा : नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून छत्री वाटप,

Advertisement
Share Now