पोलीस महासंचालकांना मानवी हक्क आयोगाचे समन्स,
Human rights commission: पोलीसांनी केलेल्या अत्याचाराची तक्रार पुण्यातील केयर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनने केली होती,

Human rights commission: पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
कोरोना संक्रमणाच्या काळात रस्त्यावर काही कामानिमित्ताने घरा बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीसांकडून मारहाण झाल्याची घटना पाहायला मिळत होती.
त्यात शासकीय कर्मचा-यांनाही मार खावे लागले होते. तर त्या संदर्भातील मारहाणीचे फोटो व विडिओ सोशल मीडियावर वायरलही झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी एक प्रकारे रुद्र अवतारच धारण केल्याचे दिसून आले.
सर्व सामान्य माणसाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिल्याने काही तज्ञांनी नाराजगी ही व्यक्त केली होती.
अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पुण्यातील वकिलांची मागणी,
त्यात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देत सांगितले की संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांनी बांबूला तेल लावून बडवावे.
असे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनी दिल्याने पोलीस मग सिंगमच झाले.
पोलीसांनी केलेल्या अत्याचाराची तक्रार पुण्यातील केयर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनचे
कार्यालयीन अधीक्षक डॉ अभिषेक हरिदास यांनी मानवी हक्क आयोगास ई-मेल द्वारे सर्व पुराव्या सहित तक्रार केली होती.
त्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांना समन्स काढले असून दिनक 3 सप्टेंबर २०२० रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड