चिकन तंदुरी उधारीने न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण,
भवानी पेठेतील लिमरा हॉटेल येथील प्रकार.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : भवानी पेठ चुडामन तालीम येथील लिमरा हॉटेल चालकाने चिकन तंदुरी उधारीवर न दिल्याचा ,
राग आल्याने काही जणांनी मिळून हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. जावेद शेख,वय-४० वर्षे,रा ५१२,
भवानी पेठ यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार बबन ऊर्फ अरबाज इकबाल शेख वय- २२, रा.चुडामन तालीम चौक,
भवानी पेठ,अतहर मुझफर सैय्यद, वय- २३,रा.गुरुनानक नगर, सकलेन युनुस कुरेशी, वय-२०, रा.अरफात टॉवर,शिवनेरीनगर,
गल्ली नं. ३० , कोंढवा, या तिघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशी की लिमरा रेस्टॉरंट येथे यातील फिर्यादी यांचा पुतण्या जुबेर शेख याने बबन ऊर्फ अरबाज शेख यास चिकन तंदुर उधारीने दिले नाही म्हणुन त्यास शिवीगाळी केली.
फिर्यादी हे बबन ऊर्फ अरबाज यास समजाविण्यास गेले असता,त्याने व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून,
फिर्यादीस शिवीगाळ करुन, जवळ चालु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहुन लाकडी दांडके घेवुन,तुला जिवंत सोडणार नाही,
तुला खल्लासच करतो असे म्हणत त्यांच्या अंगावर धावून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात, पाठीवर तसेच हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून आमच्याकडून पैसे मागतो काय,आम्ही येथील भाई आहे,तुम्हाला निट धंदा करायचा का नाही,
असे मोठ- मोठ्याने ओरडुन,सदर भागामध्ये दहशत पसरविल्याने, त्यांच्या दहशतीस घाबरुन, नागरीक सैरावैरा पळु लागले तर दुकादारांनी आप-आपली दुकाने बंद केली.
सदरील गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहीते करीत आहे.