चोराशी रोमॅन्टिक चॅटिंग करून प्रेमात पाडले ,व नंतर त्याला तुरुंगात पाठविले

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

Honey trap : फेसबुकमुळे गुन्ह्याची उकल, लाखो रुपयांचा डल्ला मारणारा केअर टेकर गजाआड

Honey trap : पोलीस न्यूज 24 :

फेसबुकच्या आधारे सांगवी पोलिसांनी उत्तम प्रकारे गुन्ह्याची उकल करून केअर टेकरला आपल्या जाळ्यात अडकवले.

कारवाईदरम्यान आरोपी केअर टेकरकडून पोलिसांनी २४ तोळे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सहा लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याचे २४ तोळ्यांचे दागिने व ४० हजारांची रोकड चोरीला गेल्याप्रकरणी संगीता अजित कांकरिया (५२, रा. क्रांती चौक, कीर्तीनगर, नवी सांगवी) यांनी १७ आॅक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

honey trap the-thief-was-arrested-by-sending-a-friend-request-on-facebook

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, फिर्यादी संगिता यांनी २० सप्टेंबर रोजी कपाटामध्ये दागिने ठेवले होते.

२१ ते २५ सप्टेंबरच्या दरम्यान केअर टेकर म्हणून संदीप भगवान हांडे (२५) हा अचानक काम सोडून गेला. त्यामुळे पोलिसांनी हांडे याच्यावर संशय व्यक्त करून त्याचा शोध सुरू केला.

वाचा :>> हडपसर | आयडियल ऐजुकेशन ट्रस्ट संचालित शाळांनी लाखो रुपयाचे अनुदान घेऊन हि त्याचा योग्य तो वापर न केल्याचे उघड. –

तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांनी हांडे याला मुलीच्या नावाने फेसबुकवर फें्रड रिक्वेस्ट पाठवली.

सदर फे्रंड रिक्वेस्ट हांडे ने स्वीकारली,व त्यानंतर काही दिवसापर्यंत पोलीस त्याच्याशी ‘रोमॅन्टिक चॅट’ करत होते.

हांडेचा विश्वास बसल्यानंतर प्रेमाच्या आणाभाका देत पोलिसांनी हांडेला ‘कपल पॉईंटला’ भेटण्यास बोलवले.

हांडे येण्यापूर्वीच पोलिसांनी कल्पतरू चौक परिसरात सापळा लावला . हांडे तेथे येताच क्षणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने संगिता कांकरिया यांच्या घरातून दागिने व रोकड पळवल्याची कबुली दिली.

वाचा >> पुण्यातील कॅम्प परिसरात मित्रानेच केला मित्राचा खून,

कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले 24 तोळे सोन्याचे दागिने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्याची उकल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद भोईटे,

वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले,

पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोºहाडे,

पोलीस शिपाई अरुण नरळे, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर आदी पथकाने केली.

Advertisement
Share Now