हडपसर सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री पर्यंत जड वाहनांना बंदी,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Heavy vehicles banned ) पुणे शहर वाहतूक शाखेने काढले आदेश.

(Heavy vehicles banned ) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

पुणे शहरातील हडपसर सय्यदनगर येथे वाहनांची कोंडी होत असल्याने व वारंवार अपघात होत असल्याने,

जड वाहनांना बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली होती.

त्या संदर्भात सय्यदनगर रेल्वे गेट ते हांडेवाडी चौक आणि सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री चौक या दोन्ही रोडवर,

सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री १० वाज़ेपर्यंत या वेळेत जड़ वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

वाचा : सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त,

या संदर्भातील आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी काढले आहेत.

फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, पोलीसांच्या वाहनांन व्यतिरिक्त इतर वाहनांना बंदी असणार आहे.

नागरीकांना याबाबत काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा येरवडा पुणे, येथे २३ तारखेपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्याचे अहवान करण्यात आले आहे.

वाचा : दिवाळी निमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने म.न.पा आरोग्य सेवकांना साडी व फराळाचे वाटप

Advertisement
Share Now