रोख रक्कम दुचाकीवरून घेऊन जाताना तीन जणांनी त्याला लुटले,
६० हजार रुपये खिशातून काढून आरोपी झाले फरार.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील उपनगर परिसरात दुचाकीवरून रोख रक्कम घेऊन जात असलेल्या इसमाला अडवून,
त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाराप्पा बनसोडे वय 30, मुंढवा यांनी,
हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे हडपसर परिसरातील माळवाडी भागात ऑफिस आहे. मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या,
सुमारास ते सिरम कंपनीकडून कॅनॉलरोडने माळवाडीकडे जात होते. त्यांच्याकडे ६० हजार रुपयांची रोख रक्कम होती.
ते दुचाकीवर जात असताना अचानक एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले आणि धमकावत खिशातील ६० हजार,
रुपयांची रक्कम काढून घेतली. तसेच सिरम कंपनीच्या दिशेने पसार झाले.फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. पण रात्रीची वेळ,
असल्याने कोणीही मदतीला आले नाही. यानंतर त्यांनी पोलीसाना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.