१८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोराने केले लंपास,

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सध्या पुणे शहरात चोरीचे व घरफोडीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. चोरांना धरण्याचे पोलीसांसमोर एक प्रकारे आहवनाच आहे.

वानवडी येथील एका बंगल्यातून १८ लाखांचे सोने चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्या संदर्भात एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हकीकत अशी की फेअर रोड बंगला नं.२,टफल प्रायव्हेट लिमीटेड वानवडी, येथे फिर्यादी यांचे राहते घराचा दरवाजा उघडा असताना,

Advertisement

कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराचे उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून,

बेडरुम मध्ये असलेल्या तिजोरीच्यावरती ठेवलेल्या सोन्याचे दागिन्यांचा बॉक्स त्यामधील एकुण १८ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिन्याचा ऐवज चोरी करून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

%d bloggers like this: