गजानन मारणे अखेर येरवडा जेलमध्ये बंद,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केली थेट येरवडा कारागृहात रवानगी.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : तळोजा तुरुंगातून बाहेर पडलेल्या गजानन मारणेला मिरवणूक चांगलीच महागात पडली आहे.तर विविध ठिकाणी त्याचावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

गुन्हे दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मारणेला अखेर येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. मेढ्यात जि.सातारा पोलिसांनी त्याला अटक केली होती.

एमपीडीएअंर्तगत गजानन मारणेची एका वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.फरार झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते.

शनिवारी मेढय़ात चारचाकी डस्टर गाडीतून तो फिरत असल्याची माहिती मिळताच मेढय़ाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या.

तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून पुण्यापर्यंत शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता.

त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा फरार झाला होता.

शनिवारी जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजानन मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली मेढा शहरात चारचाकी डस्टर गाडीतून फिरत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणेला काल जेरबंद करण्यात आले आहे.

Advertisement
Share Now