पत्रकारावरील खुनी हल्ल्यातील फरारी आरोपीला दिड वर्षाने अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement
Cigarette Chor
संग्रहित छायाचित्र


पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपीला दिड वर्षांनने भारती विद्यापीठ पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस उप-निरीक्षक नितीन शिंदे हे त्यांच्या तपास पथकातील स्टाफसह कात्रज पोलीस चौकीच्या हददी गुन्हयास प्रतिबंधकासाठी पेट्रोलिग करित असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख,

व सचिन पवार यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरवळ मधील पत्रकार मुराद पटेल यांच्यावरील खुनी हल्ल्यातील फरार आरोपी शफीक रफीक शेख ,

हा कात्रज बायपास चौकाच्याजवळ मित्रांना भेटायला येणार आहे ,मिळालेली माहितीनुसार वरिष्ठांना कळवत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार शेख याला ताब्यात घेवुन त्याच्याकडे,

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नेऊन अधिक चौकशी करता त्याने त्याच्या इतर साथीदार याच्यासह पत्रकार मुराद पटेल यांच्यावर कट रचुन.११ एप्रिल २०१९ रोजी शिरवळ, ता खंडाळा,

जि सातारा गावच्या हददीत शिवाजी चौक ते सटवाई कॉलनी जाणाऱ्या रोडवर मदरसा लगत गाडी अडवुन सत्तुर आणि चाकु यांच्या सहयाने खुनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी हा दिड वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देत होता.सदर दाखल गुन्हयामध्ये यापुर्वी त्याचे साथीदारांना स्थानिक पोलीसाकडुन अटक करण्यात आली आहे.

सदरील कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,अर्जुन बोत्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक,नितीन शिंदे,

अंमलदार संतोष भापकर, रविन्द्र भोसले, सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांनी केलेली आहे.

Advertisement
Share Now