२५ कोटी रुपये कर्ज मिळवुन देण्याचे बहाण्याने केली फसवणुक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

८०लाखांचा मुद्देमाल जप्त : खडक पोलिसांची कामगिरी.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कर्ज देण्याचे बहाण्याने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करुन पोलिसांनी आरोपींना गजाआड केले.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी माने यांचा टॅक्स अँड बिझनेस कन्सल्टन्सीचा व्यवसाय असुन त्याचे ऑफिस मार्केटयार्ड येथे आहे.

व्यवसाया करीता माने यांना २५ कोटीचे रुपये कर्जाची आवश्यकता असल्याने आरोपी पंकज मेहीलाल पांडे, ए ४ बिल्डिंग, फ्लॅट नं. ६, ब्रह्मा हॉरिझोन सोसा. इन्साईड कुबेरा पार्क लुल्लानगर,

जयंत गायकवाड, बी- १/७, लेकविव्ह सोसा सुखसागर नगर, कात्रज, सात्विक चंद्रशेखर, अविनाश गुराप्पा, समीर मोहम्मदअली.

मदिना मंझिल, प्लॉट नं. १३६, फोर्थ अॅव्हेन्यू, सी शोअर टाऊन, पानैऊर बीच, ईस्ट कोस्ट रोड, चेन्नई यांनी २५ कोटींचे कर्जाची रक्कम देतो असा विश्वास देवुन कर्ज रक्कमे वरील व्याजापोटी,

१ कोटी ५२ लाख ४५ हजार रुपये फिर्यादी यांचेकडुन घेवून २५ कोटी रुपये कर्ज मिळवुन देण्याचे बहाण्याने फसवणुक केली.

म्हणुन खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाकडुन आरोपींचा शोध घेत असताना अशा प्रकारे अनेक जणांची फसवणुक केल्याचे लक्षात आले,

त्यानुसार खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचा-यांनी चेन्नई तामीळनाडु येथे जावुन शोध घेतला असता सर्व आरोपींचे आधारकार्ड वरील पत्ते पुर्णपणे चुकीचे असल्याने आरोपी मिळून येत नव्हते,

त्यानंतर आरोपी हे वांरवांर त्यांचे राहण्याचे पत्ते व मोबाईल क्रमांक बदलत होते, त्यानंतर पोलिसांनी आरोपींचे वापरातील वाहनाचे नंबरचे आधारे शोध घेतला असता,

व्ही एम महंम्मद दाऊद खान वय २८ वर्षे रा.सी शोर टाऊन ४ अॅव्हेन्यू पन्नायूर चेन्नई, आर कार्तीक रविकुमार वय ३२ वर्षे रा. सी शोर टाऊन अॅव्हेन्यू पन्नायूर चेन्नई हे मिळुन आल्याने त्यांना,

ताब्यात घेवून त्यांनी गुन्हयात वापरलेली चारचाकी मर्सिडीज बेंझ व इनोव्हा क्रिस्टा व त्यांच्याकडील ४ मोबाईल फोन असा एकुण ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांना गुन्हयात अटक केली.

अशा प्रकारे अनेक नागरीकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले असुन ज्यांची फसवणुक झालेली आहे, त्यांनी खडक पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

कारवाई ही डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना,

यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, हर्षवर्धन गाडे,यशपाल सुर्यवंशी, बंटी कांबळे, समीर माळवदकर, अमेय रसाळ, संदिप पाटील, राहुल मोरे यांचे पथकाने केली.

Advertisement
Share Now