आर्मी मध्ये कामाला लावतो म्हणत हजारो रुपयांची फसवणूक,
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आर्मी मध्ये कामाला लावतो असे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात राम उबाळे,वय २४ वर्षे,रा.सोलापूर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्या फिर्यादीवरून अमित अशोक नलावडे,वय ४५ वर्षे,रा. गुरुवारपेठ , कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे.
सन २०१८ ते २५ डिसेंबर २०२० पावेतो स्वारगेट जेधे चौक येथे नटराज हॉटेल तसेच सार्वजनीक जागी उबाडे यांना नमुद इसम,
वेळोवेळी भेटून माझी आर्मीमध्ये बडया अधिका-यांच्या ओळखी आहेत. तुमची भरती करतो असे भासवून त्यांच्याकडून ३० हजार,
रोख रक्कम घेतले. त्यांनतर उबाडे यांनी भरतीचे काम कधी होणार याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता वेगवेगळी कारणे सांगून,
टाळाटाळ केली व त्यांनतर फिर्यादीचे व साक्षीदार यांना जॉइनींग लेटर देतो असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांना बनावट आर्मीचे,
सही व शिक्के असलेले जॉइंनीग लेटर दाखवून व त्या मोबदल्यात साक्षीदार यांना ५० हजार रुपये दयावे लागतील असे सांगून,
फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहे.