जास्त व्याजाचे आमिष दाखवून ६५ लाख रुपयांची फसवणूक,
स्वारगेट पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : जास्त व्याज मिळून देतो असे भूलथापा मारून एकाची ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रिचर्ड अंची वय- ५८ रा. भोसलेनगर, पुणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पंकज भागचंद छल्लाणी ,रा.
ओमशांती,रघुवीर सोसायटी, मुकुंदनगर, पुणे यांना अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१४ पासुन ते अद्यापपर्यंत टाईम केअर बिल्डींग,
पहिला मजला पुणे-सातारा रोड,आदिनाथ सोसायटीचे जवळ, येथे यातील फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी छल्लाणी यांचेकडे विश्वासाने,
गुंतविलेल्या रकमेवर छल्लाणी यांनी फिर्यादी यांना जास्त व्याजदराचे अमिष दाखवुन, नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१८ या कालावधी मध्ये,
६५ लाख रूपये ठेव म्हणुन स्विकारले व मार्च २०१८ पासुन सदरची ठेव रक्कम व त्यावरील व्याज परत न करता,फिर्यादी यांची अर्थिक फसवणुक केली आहे.
तसेच फिर्यादी यांचेप्रमाणेच इतर साक्षीदारांना १८ ते २४ टक्के दराने व्याज देण्याचे अमिष दाखवुन त्यांचीही फसवणुक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वाती देसाई आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.