नामांकीत हॉटेल मधील जेवणाच्या थाळीवर ऑफर असल्याचे सांगुन लाखो रुपयांची फसवणूक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.( Hadapsar police station news)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचे लालसा पोटी आज फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. जेवढी मोठी ऑफर तेवढी मोठी फसवणूक केली जात आहे.

असाच एक फसवणूकीचा प्रकार घडला आहे.मोबाईलवरून ऑनलाईन माध्यमाव्दारे नामांकित हॉटेल( hotel) मधील जेवणाची थाळीवर ऑफर असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्या संदर्भात एक ३८ वर्षी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला एका नामांकीत हॉटेल मधील थाळीवर ऑफर असल्याचे सांगुन,

ती थाळी बुक करण्यासाठी लिंक पाठवुन,सदरची लिंक ( link) फिर्यादी यांचे कडुन भरुन घेतली,व त्यांना बोलण्यामध्ये मग्न करुन फिर्यादींचे बँक

खात्या मधील एकुण १ लाख ४४ हजार ४९७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजु अडागळे करीत आहेत.

Advertisement
Share Now