आर्ट ऑफ लिव्हींगच्या नावाखाली करोडो रुपयांची फसवणुक,

ठगास गुन्हे शाखा युनिट ४ कडुन अटक.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कोण कधी कोणाला कसे फसवेल याचा अंदाज लावणे सध्या कठिणच आहे.
फसवणूकीचे प्रकार सध्या तेजीत आहे. आर्ट ऑफ लिव्हींगच्या नावाचा वापर करत करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आर्ट ऑफ लिव्हींग’ (AOL) चे मुख्यालय उदयपुर बेंगलोर येथे असुन त्याच्या शाखा देशभरात असुन सदर संस्था ही लोकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्त्व लोकांना पटवुन देण्याचे महत्वाचे काम करते.
त्याच्या पुण्यातसुद्धा शाखा आहेत. असे भासवून प्रणय उदय खरे याने सदर आर्ट ऑफ लिव्हींग’ संस्थेत प्रवेश मिळवुन डी.डी.सी.(डीस्ट्रीक डेव्हलपमेंन्ट कोऑर्डीनेटर) या पदावर असल्याचा बनाव करुन,
‘आर्ट ऑफ लिव्हींग’ची त्याचे जे. के. व्हेंचर्स कंपनी मार्फत कार्यशाळा आयोजीत करीत होता.
सदर कंपनी ही ‘आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेशी संबंधित असल्याबाबत लोकांना माहिती देवुन वेगवेगळ्या आर्थीक गुंतवणुकीच्या स्कीम सांगुन त्यांचा विश्वास संपादन करत असे,
व त्यांचेकडुन मोठमोठ्या रकमा घेवुन त्या रकमेचा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वापर करीत असलेबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
प्रणय उदय खरे रा. फ्लॅट नं. १. मोनार्च गार्डन सोसायटी एन.आय.बी.एम.साळुंखे विहार टेलिफोन एक्सचेंजचे मागे कोंढवा, पुणे याचेविरुध्द प्राप्त तक्रारीमध्ये,
त्याने जे.के.व्हेंचर्स नावाची बोगस कंपनीची स्थापना करुन कंपनी मार्फत रत्नागिरी, खेड येथे ७००০ एकर जागा घेतली आहे असे सांगुन.
सदर जागे मध्ये १५ वर्षा करीता १ एकर जागे साठी गुंतवणूक केल्यास, पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये, त्यानंतरचे ५० गुंतवणूकदारांना ५० लाख रुपये,
त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणूकदारांना ४० लाख रुपये, सहा वर्षानंतर टप्याटप्याने दिले जातील तसेच एस.टी.पी. (शॉर्ट टर्म प्लॅन), व मोरींगा झाडे लावण्याचे प्लॅन मध्ये पैसे गुंतवल्यास फिर्यादीला भरपुर नफा मिळेल,
असे भासविल्याने अश्वीनीकुमार बळीराम कांबळे यांनी १,४५,१६,१११ रुपये वरील कंपनीचे स्किम मध्ये गुंतविले परंतु कोणताही परतावा न देता खरे याने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता,
पैशांचा अपहार करुन फसवणुक केली. म्हणुन अश्वीनीकुमार बळीराम कांबळे यांनी त्याचे विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्या विरोधात चतृश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरे याला युनिट-४ गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्याची ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.
तसेच आरोपीने विस्तार योगीक, ए.एच.ओ.लाईफ स्टाईल प्रा.लि., प्रणल्स मेडिया प्रा.लि. नावाने कंपन्या स्थापन केल्या असुन त्यामार्फत देखील,
त्याने वेगवेगळ्या लोकांची वरिल स्किमच्या माध्यमातुन पुणेशहरात व पुणे शहराबाहेर बऱ्याच लोकांना फसवले असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे.
तरी नागरिकांनी समोर येवुन अशाप्रकारे कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट -४ रेंजहिल्स खडकी पुणे येथे संपर्क साधावा असे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.