कॅन्सरचा आजार असल्याचे खोटे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक,
फिर्यादीस लिव्हर असायटीस कॅन्सरची गाठ, पोटात पाणी वगैरे भूलथापा मारले.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात एका महिलेला खोटेनाटे सांगून व भूलथापा मारून १ कोटीची फसवणूक केल्याचा,
प्रकार उघडकीस आला आहे. एक महिला वय ५८ वर्षे रा. वडगांव बुद्रुक पुणे.असे फसवणूक झालेल्या महिलेने वानवडी पोलीस,
ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. सन २०१७ ते आजतागायत गुन्हा घडला आहे.
फिर्यादी यांच्याशी ओळख करून, करून फिर्यादीस लिव्हर असायटीस (Liver Ascites) कॅन्सरची गाठ, पोटात पाणी वगैरे,
असल्याचे भूलथापा मारून वेळो-वेळी संमोहित (हिपनॉटाइज) करून फिर्यादी यांना कोणताही आजार नसताना कॅन्सरचा आजार झाला आहे.
असे खोटेनाटे सांगून विश्वास संपादन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीकडून वेळोवळी घेतलेले चेक त्यांच्या बँक खात्यामध्ये,
वटवविले आणि खात्यातून एकुण १ कोटी ४७ लाख ५८ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली आहे.पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहे.