एटीएम मधून पैसे काढताना मदतीला आला आणि ३२ हजाराला चुना लावला,

हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आजकाल मदतीचा हात पुढे करून लुटीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

यात हातचालाखीने हजरो लाखो रुपयांचा फटका नागरिकांना बसत आहे.

असाच एक प्रकार एका ६५ वर्षीय वृध्दासोबत घडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा हडपसर पुणे येथील ए.टी.एम.

सेंटरमध्ये वृध्द व्यक्तीचे स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा हडपसर पुणे या शाखेत पेशनचे बँक अकाऊंट असुन पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेले होते.

Advertisement

ए.टी.एम.सेंटर मध्ये त्यांच्या पाठीमागे थांबलेल्या अज्ञात इसमाने त्यांना ए.टी.एम.सेंटर मधुन पैसे काढुन देण्याचे बहाण्याने त्यांचे कडुन ए.टी.एम. कार्ड घेवुन हातचलाखीने दुसरेच कार्ड ,

ए.टी.एम.मशिनमध्ये टाकुन ए.टी.एम.चा पिन टाकणेस सांगितले, तो पाहुन नंतर फिर्यादीचे मुळ कार्ड न देता दुसरेच स्टेट बँकेचे कार्ड देवुन ए.टी.एम.कार्ड घेवुन त्या कार्डद्वारे वृध्द व्यक्तीचे ,

अकाऊंटमधुन ३२ हजार कादुन घेतले व त्या वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
%d bloggers like this: