कुख्यात गुंड गजानन मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पोलिसांकडून अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

संजय काकडेंना पुणे पोलिसांनी अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : गुंड मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा तुरूंगातून सुटल्यावर मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरून जंगी मिरवणूक काढली होती.

त्या मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती.

आणि रॅलीत सहभागी असलेल्यांचा शोध घेत धरपकड सुरू केली होती. अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

तर आता थेट राजकारणात दबदबा असलेले माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आज बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
Share Now