मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी,
(Rupali Patil) जिथे असशील तिथे संपवून टाकू अशी फोन करून दिली धमकी.

(Rupali Patil) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :
पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.
आता थेट उमेदवारालाच धमक्या येत असल्याने खळबळ उडाली आहे.
मनसेच्या पुणे पदवीधरच्या उमेदवार असलेल्या रूपाली ठोंबरे- पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एकाने फोन करून ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू.
आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिल्याने धक्काच बसला आहे.
वाचा : हडपसर येथील शफी इनामदार विरोधात वानवडी पोलिसात आणखीन एक F I R दाखल,
याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.या निवडणुकीमध्ये रंगत वाढली असून उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे.
वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पदवीधरांच्या भेटीगाठी घेणे, प्रचार करणे अशी कामे करीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा व माजी नगरसेविका रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत.
वाचा : सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त,
Pingback: (Tadipar criminals ) सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त