माजी आमदार योगेश टिळेकर यांना जामीन मंजूर

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

yogesh tilekar jamin : न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

yogesh tilekar jamin : पोलीस न्यूज 24:

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपा चे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह चार नगरसेवक आणिभाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले होते.

त्यानंतर त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

परंतु, आज अखेर त्या सर्वांना जामीन मिळाला असून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

वाचा : https://policenews24.in/former-mla-yogesh-tillekar-arrested/

कोंढवा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात आंदोलन करण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी योगेश टिळेकर यांच्यासह 40 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

दरम्यान, आज न्यायालयात त्यांच्या वकीला मार्फत जामिना साठी अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

त्यांच्याबरोबरच त्यांच्यासहीत चार नगरसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आले आहे.

वाचा : मुस्लिम महिलेचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करणा-यावर कारवाईची मागणी

Advertisement
Share Now