भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण करणारे ‘ ते ‘ पोलीस उपनिरिक्षकासह पाच जण तडकाफडकी निलंबित

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Police sub inspector suspended ) भाजप पदाधिकाऱ्यास मारहाणीचे विडीयो झाले होते वायरल

(Police sub-inspector suspended ) पोलीस न्यूज24 :

जालना : भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारियलवले यांना काठी तुटेपर्यंत पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती .

हा प्रकार माध्यमांसह भाजप नेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी उचलून धरत दोषी पोलिसांविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली .

दरम्यान 24 तास उलटत नाही तोच जालना जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरिक्षकसह पाच जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे .

VIRAL VIDEO

त्यामुळे पुन्हा पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यामार्फत चौकशी सुरू होती .

अखेर शुक्रवारी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम , पोलीस कर्मचारी सोमनाथ लहानगे , नंदकिशोर ढाकणे ,

सुमित सोळंके , महेंद्र भारसाकळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत .

वाचा : माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलीसांचा छापा, २२ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

दरम्यान या व्हिडियोमध्ये दिसणारे निलंबीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन

यांचा अहवाल औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून उद्या त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे .

काय आहे प्रकरण ? जालना । डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप करत महिनाभरापूर्वी एका रुग्णालयात जाब विचारणारे भाजपच्या सरचिटणीस शिवराज नारियलवाले जालना पोलिसांनी लाठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती .

हा प्रकार गुरुवारी समोर आला आहे . या अमानुष मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे .

त्यात नारियलवाले ‘ साहेब माफ करा ‘ , साहेब माफ करा अशी विनवणी करत असतानाही जवळपास पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यानी त्यांना मारहाण करत आहेत .

शिवराम नारियलवाले यांच्या एका नातेवाईकाच्या अपघात झाला होता .तेव्हा रुग्णालयात त्या नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .

मात्र , डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत काही तरुणांनी रुग्णालयात महिनाभरापूर्वी गोंधळ घातला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे .

लाचेच्या प्रकरणात अटक झालेले तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि कदिम जालना ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यांचा तुफान मारा केला .

भाजपचे कार्यकर्ते रुग्णालयात धुडघूस घालत असल्यानेच त्यांना अटकाव करण्यासाठी हा लाठीमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .

वाचा : बोगस आयकार्ड प्रकरणी नगरसेवकाच्या संस्थेला पुणे मनपाने मागितला खुलासा,

Advertisement
Share Now