कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री विरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

डॉक्टर सुनेने वानवडी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यातील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व त्यांचा मुलगा अभिजीत शिवरकर व इतरांविरोधात डॉक्टर असलेल्या सुनेचा छळ केल्याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

याप्रकरणी स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली होती.स्नेहा यांचे नोव्हेंबर २००९ मध्ये अभिजित शिवरकर यांच्यासोबत लग्न झाले होते.

तेंव्हापासून घरात पती, सासू व नणंद यांनी किरकोळ गोष्टीवरून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत असत. आम्हाला डायबेटिक सून नको असे ते म्हणत. तसेच पती अभिजीतचे बाहेर अनैतिक संबध असल्याचे स्नेहा यांना समजले होते.

त्याबद्दल स्नेहा जाब विचारत असल्याने सासरच्यांना राग येत होता त्या रागातून स्नेहा यांचा शारीरिक अन मानसिक छळ केला जात.

Advertisement

आमचे कुटुंब प्रतिष्ठित असून बाहेर कोठेही काही बोलू नको, असे म्हणत वारंवार शिवीगाळ,मारहाण करत असल्याचे स्नेहाने तक्रारीत म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे करीत आहेत.

Advertisement
Share Now