कोरोना नियम उल्लंघन करून बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

डेक्कन गॅलक्सी हॉटेलवर डेक्कन पोलीस ठाण्याकडुन कायदेशिर कारवाई.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कोरोना संसर्गाने सर्वत्र ठिकाणी आहाकार सुरू असताना देखील पुणे शहरातील हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.

डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल डेक्कन गॅलक्सी येथे हॉटेल चालू ठेवुन ग्राहकांना हुक्का विक्री व जेवण पुरविले जात आहे,

अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना प्राप्त झाल्याने सदर बाबत खातरजमा करुन योग्य कार्यवाही करणे करीता तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे,

पोलीस हवालदार गुजर, शिंदे, पोलीस अंमलदार देवढे, पोलीस अंमलदार बर्डे सदर ठिकाणी रवाना झाले.

हॉटेल डेक्कन गॅलक्सी येथे जावुन खात्री केली तेव्हा हॉटेल मॅनेजर व कामगार हॉटेलमधील ग्राहकांना हुक्का व जेवण पुरवितांना मिळुन आले.

हॉटेलमध्ये मिळुन आलेला हुक्का तंबाकुजन्य असण्याची शक्यता नाकारता येणार नसलेने त्याची तपासणी करणे करीता नमुद हुक्क्याची ४ नमुने छोटया प्लॅस्टीक पिशवीत पॅक करुन केमिकल अॅनालझर कडे पाठविणे आले तर तसेच २ हुक्का पॉट पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत.

तसेच सध्या कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य विषाणू आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासन तसेच पुणे महानगरपालिका यांचे कडुन पारित करण्यात आलेल्या आदेशाचे

उल्लंघन करतांना मिळुन आल्याने हॉटेल मॅनेजर, कामगार व ग्राहक यांचेवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) कोप्ता कलम ४ अ, २१ अ, प्रमाणे त्यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Share Now

One thought on “कोरोना नियम उल्लंघन करून बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

Comments are closed.